ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
May 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

कराड : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 96 असे एकूण 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

10 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.