ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
65 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह तर....95 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल 
April 27, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

 

65 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह तर....95 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल 

सातारा   : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 20 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 30 असे एकूण 65 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच  26 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 35, उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 43 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 14 असे एकूण 95 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.   या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका कोविड-19 बाधित रुग्णाचा 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यास आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक          डॉ.   गडीकर यांनी कळविले आहे.
0000