ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह 14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
May 23, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

 

6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह

14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

कराड : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.

यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला (वय 44), गलमेवाडी कुंभारगाव ता. पाटण येथील 1 युवती (वय 24) असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8 असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 247 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 127 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.