ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
276 नागरिकांना केले विलगीकरण कक्षात दाखल
May 1, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

 

276 नागरिकांना केले विलगीकरण कक्षात दाखल

कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43(आरोग्य कर्मचारी-24, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-2,  कोविड बाधित रुग्णांचा निकट सहवासित-8, प्रवास करुन आलेले-8, व कोरोना बाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा पहिला नमुना-1), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 95 (कोरोना बाधिताचे निकट सहवासित-90, कोरोना बाधित परिसरातील गरोदर माता-5),  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 122 (आरोग्य कर्मचारी-10 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-57, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 21, कोरोना परिसरातील गरोदर माता-10, कोरोना बाधित निकट सहवासितांचा 14 दिवसांनतरचा नमुना-23), ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 16 (आरोग्य कर्मचारी-4, प्रवास करुन आलेले-3, कोरोना बाधिताचे निकट सहवासित-9) अशा एकूण 276 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.