ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
22 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह... 4 जणांना विलकीकरण कक्षात दाखल.... 12 एप्रिल रोजीची आकडेवारी
April 12, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

22 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह... 4 जणांना विलकीकरण कक्षात दाखल.... 12 एप्रिल रोजीची आकडेवारी

कराड : सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 2, कराड कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या 13 तर कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल असणाऱ्या 7  अशा 22 अनुमानित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. 

दिल्ली व इतर राज्यात प्रवास करुन आलेले 3 नागरीकांना तसेच श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे  एका नागरिकास जिल्हा रुग्णालयात कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  या 4 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

 दिनांक 12.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हाे एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी

 जिल्हा शासकीय रुग्णालय- 244
कृष्णा हॉस्पीटल, कराड-176
खाजगी हॉस्पीटल-4
एकूण दाखल - 424
प्रवासी-108, निकट सहवासीत-232, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-84 = एकूण 424
14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 4
कोरोना नमुने घेतलेले एकूण- 428
कोरोना बाधित अहवाल - 7
कोरोना अबाधित अहवाल - 369
अहवाल प्रलंबित - 48
डिस्चार्ज दिलेले- 370
मृत्यू - 2
सद्यस्थितीत दाखल- 52
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 12.4.2020) - 848
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 848
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 547
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 301
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 131
आज दाखल - 4
यापैकी डिस्जार्ज केलेले- 71
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
अद्याप दाखल - 57