ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
21 रिपोर्ट निगेटिव्ह... 29 जण दाखल
April 26, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

21 रिपोर्ट निगेटिव्ह... 29 जण दाखल

सातारा  :  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 असे एकूण 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दि. 25 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 24 असे एकूण 29 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका कोरोना  बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला पहिला नमुना निगेटिव्‌ह आल्याने दुसरा नमुना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या एका कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला पहिला नमुना निगेटिव्‌ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.