ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
14 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह, 12जणांना दाखल
April 20, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

14 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह, 12जणांना दाखल

कराड  :  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 3 असे एकूण 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा 10 नागरिकांना बाधित रुग्णाचे सहवासित म्हणून 14 दिवसानंतरच्या पुनर्तपासणी करीता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथे प्रत्येकी 1 नागरिक अशा एकूण 12 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.