ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
  *आज जिल्ह्यात पंधरा कोरोना मुक्त, जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना* 
May 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

 

*आज जिल्ह्यात पंधरा कोरोना मुक्त, जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना* 

कराड : आज सातारा जिल्ह्यातील 15 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना आहे. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 15 रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 15 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले.

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील  एकूण 35 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.