ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
‘बंडातात्या’ला संपवायचे होते, बाजीराव कराडकरची खळबळजनक कबुली....बाजीरावला झाली होती तीन महिने जेल
January 9, 2020 • GORAKH TAWARE

ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि ह.भ.प. जयवंत पिसाळ या दोघांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करून मठाधिपतीपदावरून मला खाली खेचले. ते मठात कीर्तन करण्याची परवानगीदेखील देत नव्हते; या अपमानाचा बदला म्हणून मी बंडातात्या आणि जयवंतला संपविण्याचा निश्चय केला होता. मात्र, बंडातात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले अन् जयवंत एकटाच सापडला, अशी खळबळजनक कबुली आरोपी बाजीराव कराडकर याने पोलीस तपासात दिली. दरम्यान, न्यायालयाने बाजीरावला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बाजीराव कराडकर याने मंगळवारी (दि. 7) दुपारी चाकूने वार करून ह.भ.प. जयवंत पिसाळ यांचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी कराडकर याला ताब्यात घेतले होते. बुधवारी तपासणीदरम्यान बंडातात्यांनाही मारण्याचा निश्चय केल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.

बाजीरावला झाली होती तीन महिने जेल

पोलिसांनी बाजीरावचे मागील पोलीस रेकॉर्ड तपासले असता मठाधिपती होण्याच्या रागातून बाजीरावने कराडमध्ये एका वारकऱयाच्या डोक्यात वीणा मारली होती. या कृत्यामुळे बाजीरावला तीन महिने जेल झाली होती. जेलवारी करून आल्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झालेला नव्हता. मला पुन्हा मठाधिपती करा, यासाठी मठाच्या सदस्यांना तो धमकी देत होता. त्यामुळे कराड पोलिसांनी बाजीरावला हद्दपार केले होते. या कारणामुळेही तो चिडून होता.