ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
स्मॉल कमिटी नेमून शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत निर्णय - मंत्री बाळासाहेब पाटील.......पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांचे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत
January 10, 2020 • GORAKH TAWARE


कराड - राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात शेतकरी व कर्जमाफी संबंधाने भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबाबत राज्यात विविध मतप्रवाह आहेत. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात आणि दोन लाखाच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, यासाठी स्मॉल कमिटी नेमून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

मयत असणारे कर्जदार शेतकरी संबंधाने काय भूमिका घ्यायची ? कारण शेतकऱ्यांचे कर्ज त्यांच्या मुलाकडे वर्ग केले जाते. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये असल्याचे सांगून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. अनेक पतसंस्था आहेत. काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. पतसंस्थांची काही प्रकरणे माझ्यासमोर आल्यानंतर ठेवीदार व संस्थांना दिलासा देण्याचा माझा प्रयत्न राहील असेही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांचे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळसाहेब पाटील यांची सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर आज येथील शासकीय विश्रामगृहात श्री. पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी   स्वागत केले.

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनीही यावेळी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. त्यांनी यावेळी माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली.स्वागतानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिलह्यातील विविध विषयांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली