ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
सातारा जिल्ह्यातील दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 जण विलगीकरण कक्षात
March 27, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यातील दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 जण विलगीकरण कक्षात

कराड - कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या  2 निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या दोन निकट सहवासात त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी कोरणा बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन निकट सहवासात त्यांना आज जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रोताचे नमुने एन आय आय व्ही पुणे येथे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील काल विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 14 वर्षाच्या बालक आणि 32 वर्षांच्या युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सातारा जिल्ह्यातील चौदा महिन्याच्या बालक आणि फिनलॅड येथून आलेला बत्तीस वर्षाचा युवक यांना ताप खोकला व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने अनुमानित म्हणून सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचा नमुना पुणे येथे पाठवण्यात आला होता. या दोघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली.