ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
शासनाच्या 100 दिवसातील निर्णय; पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
March 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

शासनाच्या 100 दिवसातील निर्णय; पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विधानभवन येथे झाले. यावेळी मंत्रीमंडळातील सदस्यांसह महासंचालक तथा सचिव माहिती व जनसंपर्क डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये विविध मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विभागांनी 100 दिवसात घेतलेल्या निवडक निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.