ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
विद्यार्थ्यांवर कराड स्वच्छतेबाबत चित्रकलेचा संस्कार.....स्वच्छतेबाबत कराड अग्रक्रमावर राहणार - यशवंत डांगे......एन्व्हायरो क्लब, नगरपरिषदेच्या चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद
February 25, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांवर कराड स्वच्छतेबाबत चित्रकलेचा संस्कार.....स्वच्छतेबाबत कराड अग्रक्रमावर राहणार - यशवंत डांगे......एन्व्हायरो क्लब, नगरपरिषदेच्या चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद

कराड  - कराड नगरपरिषदेने सुमारे दहा लाख रुपये खर्चून "आय लव कराड" हा सेल्फी पॉइंट कोल्हापूर नाक्यावर उभा केला. या सेल्फी पॉइंटचे फोटो महाराष्ट्र व देशभर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. त्यामुळे अनेक ठिकाणाहून या प्रतिकृती बाबत विचारणा झाली. या प्रतिकृतीच्या माध्यमातून कराड नगरपरिषदेची स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहोचली असून आजच्या चित्रकला स्पर्धेत ही या प्रतिकृतीसह ओला व सुका कचरा या विषयांना विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमधील आपला अग्रक्रम कायम राखण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.

बालवयातच स्वच्छतेचे संस्कार रुजूवण्यासासाठी नगर परिषदेच्या वतीने जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी "स्वच्छ कराड ,सुंदर कराड, आय लव्ह कराड" ही संकल्पनेवर आधारित भव्य चित्रकला स्पर्धे प्रीतिसंगम उद्यानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. मतिमंद आणि मूकबधिर विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग तसेच करवडी येथील अंजल इंटरनॅशनल स्कुलचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जात होता. या स्पर्धेसाठी प्रकाश जाधव, तेजस पैंट्स यांनी रंगकाम साहित्य प्रायोजित केले होते.

चित्रकला स्पर्धा कराड नगरपालिका व नेचर इनव्हारो क्लब यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. या स्पर्धेत संजीवनी इन्स्टिटय़ूटची मतिमंद मुलांची शाळा, डॉ. द शी एरम मुखबधिर विद्यालय, टिळक हायस्कुल, कन्या प्रशाला, नाना पालकर हायस्कुल, पोतदार हायस्कूल, होली फॅमिली, डी. के. पालकर स्कुल, केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कुल, शाहीन स्कुल, एस.एम एस. इंग्लिश मेडियम स्कुल, सरस्वती विद्यामंदिर, नूतन मराठी, बापूजी साळुंखे महा विद्यालय, कराड नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळा क्रमांक 3 व 9 या शाळांनी भाग घेतला होता.

पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, मोहसीन आंबेकरी, नगरसेविका अंजली कुंभार, क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, जयंत बेडेकर, चंद्रकांत जाधव, सुधीर एकांडे, रमेश पवार, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

विजय स्पर्धक : अनुक्रमे पहिले तीन, लहान गट - मनिष कुंभार, (पालकर इंग्लिश मीडियम स्कूल), अरहान कागदी, ओम वाघे (नूतन मराठी शाळा), मोठा गट सानिका गवारी (विठामाता हायस्कूल), श्वेता कदम (पोदार स्कूल), दिया भागवत (विठामाता हायस्कूल), महाविद्यालयीन गट प्रतिक्षा पवार (बापूजी साळुंखे महाविद्यालय), विशेष पुरस्कार विशाखा पवार (डॉ. द. शी. एरम मूकबधिर विद्यालय) ओमकार चौधरी, (मतिमंदांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र).

कराड नगरपरिषद आरोग्य विभागातील मुकदम संजय लादे यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन "स्वच्छ कराड, सुंदर कराड, आय लव कराड" या विषयावर चित्र काढून प्रथम क्रमांक मिळविला.