ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
रंगराव माने ट्रस्टचे उपक्रम स्तुत्य - नितीन बानगुडे पाटील.....रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सन 2020 ची दिनदर्शिका प्रकाशित
December 27, 2019 • GORAKH TAWARE

कराड (राजसत्य) - रंगराव माने चारीटेबल ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम अतिशय स्तुत्य व गौरवास्पद असल्याचे सांगून शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील म्हणाले संस्थेने अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला सन 2020 सालाची दिनदर्शिका अतिशय सुंदर व उपयुक्त अशी आहे. या दिनदर्शिकेचे मोठ्या प्रमाणात वितरण व्हावे अशी अपेक्षाही नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केली.

रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट (कराड) संस्थेची २०२० ची दिनदर्शिका शिवसेनेचे उपनेते कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, ब्रिलियंट इंग्लिश मेडिअम स्कुलचे अध्यक्ष राजेंद्र माने, शिवसेना कराड तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, कराड उपशहर प्रमुख कुलदिप जाधव, अशोक शिंदे तसेच संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होता.