ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
मृत्यु झालेल्या स्त्रीच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
April 29, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

मृत्यु झालेल्या स्त्रीच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 सातारा :  भिवडी ता. वाई येथील डोंगराजवळ अंदाजे 65 वर्षीय महिला बेवारस स्थितीत मिळून आली होती. या महिलेला उपचारासाठी  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मृत्यु झालेली स्त्री रंगाने सावळी, दात अर्धवट पडलेले, केस पांढरे, अंगात पोपटी रंगाचे जर्कींग, राखाडी रंगाचे काळा नक्षी असलेला गाऊन असे वर्णन आहे.   वारस व नातेवाईकांनी सहायक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस स्टेशनशी  संपर्क साधावा.