ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
मार्च अखेरचे त्रेमासिक विवरणपत्र ई आर- 1 ऑनलाइन सादर करावे
April 20, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या


मार्च अखेरचे त्रेमासिक विवरणपत्र ई आर- 1 ऑनलाइन सादर करावे

कराड : जिल्ह्यातील  शासकीय  निमशासकीय  तसेच  खासगीकार्यालय  यांनी  मार्च-2020  अखेरचे ई आर -1 तिमाही  विवरणपत्र  कौशल्य  विकास  रोजगारउद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावे,असे आवाहन  कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले.

ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा,असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.