ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविरोधी लढाईसाठी काँग्रेसकडून टास्कफोर्सची घोषणा...18 सदस्यीय समिती तर भालचंद्र मूणगेकर समन्वयक पदी
April 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविरोधी लढाईसाठी काँग्रेसकडून टास्कफोर्सची घोषणा...18 सदस्यीय समिती तर भालचंद्र मूणगेकर समन्वयक पदी

मुंबई - राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स घोषणा केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून जेष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे समन्वयक आहेत. 

राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे, आवश्यकता असेल तेथे सूचना व मार्गदर्शन करणे, काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेले मदत कार्य गतीमान करणे, सरकारला कोरोनाच्या लढ्यात मदत करणे, त्यांना अधिकाधिक सक्रीय करणे, कोरोनाच्या संदर्भाने सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थिती याबाबत सातत्याने माहिती घेऊन साप्ताहिक अहवाल सादर करणे. ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत आहे.

या समितीमध्ये खा राजीव सातव, मुंबई कोंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कोंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री विलास मुततेमवर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा, माजी मंत्री चंद्र्कांत हांडोरे, आमदार संग्राम थोपटे, आ. रणजीत कांबळे, माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश कोंग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेक्रेटरी डॉ अमोल देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे.