ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
महाबळेश्वर येथे पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र आवश्यकता असेल तरच प्रवास करावा
March 14, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

महाबळेश्वर येथे पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र आवश्यकता असेल तरच प्रवास करावा

सातारा - महाबळेश्वर येथे येण्यास कोणासही प्रतिबंध करण्यात आला नाही. समाज माध्यमात चुकीचा मेसेज फिरत आहे त्यावर विश्वास ठेवू नये, मात्र अत्यावश्यक गरज असेल तरच प्रवास करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. काल रात्री काही व्हाट्सअप ग्रुपवर जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करून  " "कोरनो" सातारा ब्रेकिंग:- येत्या सोमवार दिनांक 16 मार्च 2020 पासून  महाराष्ट्राचे मिनी काश्मीर ओळखले जाणारे ठिकाण महाबळेश्वर पर्यटनासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे." असा चुकीचा संदेश फिरत आहे.  अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये वेळच्या वेळी जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेऊन अथवा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.


 अफवा पसरविणाऱ्यावर सायबर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल.  अफवा पसरविणाऱ्यावर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची नजर आहे.  अथवा कोणाला असे संदेश दिसले तर ताबडतोब प्रशासनाच्या अथवा पोलिसांच्या नजरेस आणून द्यावे जेणे करून अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन ही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.