ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
मलकापूर नगरपरिषदेने काढली अतिक्रमणे
March 21, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

मलकापूर नगरपरिषदेने काढली अतिक्रमणे

कराड - कराड पाठोपाठ लगत असणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेने अतिक्रमण मोहिम सुरू केली असून पहिला टप्पा पार पडला. राष्ट्रीय महमार्गालगत वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने ठाण मांडलेले हातगाडे, टपरींसह व्यावसायिकांना हटवण्यात आले. विशेषत: कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर विनापरवाना उघड्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्यात आले असून अनेकांचे साहित्य नगरपरिषदेने जप्त केले. कोल्हापूर नाका ते हॉटेल गंधर्वपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुला 27 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. ढेबेवाडी फाटा ते आगाशिवनगर भागातही कारवाई केली आहे.

नगरपरिषदेच्या व्यवसाय विभाग प्रमुख रामचंद्र शिंदे, आरोग्य विभाग प्रमुख रमेश बागल, संपत हुलवान, सावकार देवकुळे, अमर तडाखे, महामार्ग देखभाल विभागाच्या दस्तगीर आगा यांच्यासह कर्मचारी पथकाने कारवाईत सहभाग घेतला.