ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
बौध्दांची जनगणांना होणे गरजेचे: अ‍ॅड.भीमराव आंबेडकर........संविधानात बदल करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जागृत रहावे
December 27, 2019 • GORAKH TAWARE

कराड, (राजसत्य) - जे जे बौध्द झाले आहेत, त्यांची जनगणेमध्ये नोंद होणे गरजेचे असून यावरुनच भारतातील बौध्दांची संख्या स्पष्ट होवून बौध्दांच्या सोयी सुविधा प्राप्त करुन घेण्यास सोपे होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात बदल करण्याचे सुरु असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी प्रत्येकांनी जागृत रहावे, असे आवाहन भारतीय बौध्द महासभाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.भीमराव आंबेडकर यांनी केले.

कराड येथे भारतीय बौध्द महासभेच्या सातारा जिल्हा व कराड तालुका    यांच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण येथे आयोजित 20 व्या बौध्द धम्म परिषदेत ते बोलत  होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे होते. यावेळी मुंबई चैत्य भूमीचे पूज्य भन्ते सुमेध बोधी, भारतीय बौध्द महासभाचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, सचिव एन.एम.आगाणे, भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष डी.एम.कांबळे,  सांगली जिल्हाध्यक्ष साहेबराव लोखंडे, सुदाम ढापरे, दिलीपराव थोरवडे, चंद्रकांत खडाईत, व्ही.एस.गायकवाड, डॉ.मीनाताई इंजे, प्राचार्य सुरेश खराते, अरुण गायकवाड, उत्तम मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अ‍ॅड.भीमराव आबेडकर म्हणाले,  देशात बौध्दांची संख्या 25 लाखांहून जास्त असली तरीही जनगणेवेळी त्यांची नोंद बौध्द असे न  होत नेल्याने बौध्दांची प्रत्यक्ष संख्या स्पष्ट होत नाही, याची बौध्द बांधवांनी नोंद घेवून जनगणेवेळी आपली नोंद बौध्द अशी करुन घ्यावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधनामध्ये बदल करण्याचे धोरण सत्ताधार्‍यांकडून चालू असून ते हाणून पाडण्यासाठी प्रत्येकांनी संविधानाबाबत जागृत असणे आवश्यक आहे. पुरातन विभागातून माहिती घेवून पवित्र स्थळे बौध्दांचीच आहेत, कायम करण्यासाठी बौध्दांनी पुढाकार घेवून सरकारला आपल्या मागणीसाठी भाग पाडले पाहिजे. त्यासाठी भारतीय बौध्द महासभेमार्फत पत्र व्यवहार झालेला आहे. प्रत्येक बौध्दांकडे बौध्द असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

व्ही.आर.थोरवडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने  सर्वांना धम्म प्रचार व प्रसाराचे काम करायचे आहे. धम्माचे काम वाढविण्यासाठी विविध श्रामणेर शिबीरे व बालसंस्कार शिबीरात सहभाग वाढणे गरजेचे आहे. बौध्दांचे राजपत्र धम्मयान मासिकांचे वाचन करणेचे आवश्यक आहे.

परिषदेच्या प्रारंभी  केंद्रीय शिक्षीका नंदाताई तुकाराम आढाव (मुंबई) यांचे वडुज याठिकाणी ज्ञानदान करताना निधन झाल्याने त्यांना श्रध्दाजली वाहण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल तानाजी बनसोडे, भिमराव गायकवाड, यशवंत अडसुळे, यशवंत कुंटे यांचा सन्मान करण्यात आला. अविनाश बारशिंग यांनी प्रास्ताविक केले. विद्याधर गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. भीमराव गायकवाड यांनी आभार मानले. ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्रीय शिक्षक व बौध्दाचार्य, श्रामणेर व सैनिकांनी परिश्रम घेतले.