ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
नामदार बाळासाहेब पाटील यांची ५ जानेवारीला कराडमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन
January 4, 2020 • GORAKH TAWARE

कराड (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, काँग्रेस या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात कराड उत्तरचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे.कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील हे पहिल्यांदाच कराड शहरात येत असल्यामुळे भव्य मिरवणुकीचे दि. 5 जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आयोजन करण्यात आले आहे.मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी दत्त चौकात यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे रौप्यमहोत्सवी आमदार असणारे बाळासाहेब पाटील आता नामदार झाले आहेत. रविवार दि. 5 जानेवारी रोजी नामदार बाळासाहेब पाटील कराडमध्ये दाखल झाल्यानंतर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मिरवणूक (रॅली) दत्त चौकातून सुरू होणार असून दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन दुपारी ३ वाजता मिरवणुकीस (रॅलीस) प्रारंभ होणार आहे. कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेतून दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक मार्गे प्रितीसंगमावरील आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन नामदार बाळासाहेब पाटील घेणार आहेत. प्रीतीसंगमावरून परत चावडी चौक मार्गे मंगळवार पेठेतील आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या निवासस्थानी येऊन आदरणीय स्व. पी .डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेस आमदार बाळासाहेब पाटील अभिवादन करणार आहेत. यानंतर उपस्थितांचे आभार नामदार बाळासाहेब पाटील मानण्यात येणार आहेत.