ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
नागपूर एम्समध्ये बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात
March 17, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

नागपूर एम्समध्ये बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात

नवी दिल्ली : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स)मध्ये बाहय रुग्ण सेवेस सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली .

 केंद्र शासनाने 7 टप्प्यांमध्ये देशभरात एकूण 22 एम्स संस्था उभारण्याचा निर्णय घेतला. यापैकी देशभरात आतापर्यंत भोपाळ (मध्यप्रदेश), भूवनेश्वर (ओडिशा),जोधपूर (राजस्थान), पटना (बिहार), रायपूर (छत्तीसगड) आणि ऋषिकेश (उत्तराखंड) ही 6 एम्स कार्यरत  झाली आहेत.

देशात महाराष्ट्रातील नागपूर येथील एम्ससह उत्तर प्रदेशात रायबरेली आणि गोरखपूर, आंध्रप्रदेशातील  मंगलागिरी आणि पंजाबमधील भटिंडा एम्स येथील बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात झाली आहे.