ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
दूध संकलन व्यवस्थित होईल...खासगी डॉक्टरांवर देखील मोठी जबाबदारी..रक्तदान शिबिरे घ्यावी  
March 28, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

दूध संकलन व्यवस्थित होईल...खासगी डॉक्टरांवर देखील मोठी जबाबदारी..रक्तदान शिबिरे घ्यावी  

मुंबई - ग्रामीण भागातून दूध  संकलन व्यवस्थित होईल जेणे करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

परराज्यातून आपल्या राज्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत, कुणी इथे काम करणारे कामगार आणि श्रमिक आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी प्रशासन घेईल. काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे.

खासगी डॉक्टरांवर देखील मोठी जबाबदारी

खासगी डॉक्टरांवरदेखील मोठी जबाबदारी आहे.  या लढाईत त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबाबदारी आमची आहे.

रक्तदान शिबिरे घ्यावी  

राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असे मी आवाहन करतो. कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार ही जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले आहे.


शिर्डी संस्थानाने ५१ कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत, सिद्धीविनायकने देखील ५ कोटी देऊ केले आहेत अशी माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ,वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो. मात्र योग्य उपचार झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.