ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
तीस अनुमानितांचे अहवाल आले निगेटिव्ह....तीन अनुमानित जिल्हा रुग्णालयात दाखल   
April 13, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

तीस अनुमानितांचे अहवाल आले निगेटिव्ह....तीन अनुमानित जिल्हा रुग्णालयात दाखल   

कराड - जिल्हा रुग्णालय सातारा येथे 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या 1 अशा एकूण 14 अनुमानितांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर घेण्यात आलेल्या कराड-6, फलटण-6 कोरेगाव-1, वाई-3 असे एकूण 16 कोविड-19 अनुमानित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच जिल्हा रुग्णालय, सातारा येथे काल दि.12 एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 3 नागरिकांना अनुमानित  म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या 3 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.