ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
डॉ. द. शि. एरम अपंग साहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षपदी जयश्री गुरव यांची निवड
January 29, 2020 • GORAKH TAWARE

डॉ. द. शि. एरम अपंग साहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षपदी जयश्री गुरव यांची निवड

कराड  - कराड - विद्यानगर परिसरात ४० वर्षांपूर्वी स्वर्गीय डॉ. द. शि. एरम यांनी मूकबधिर विद्यालयाची स्थापना केली. परिसरांतील मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा एक मार्ग निर्माण केला. आज या मूक बधिर शाळेची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. अशा सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्षपदी जयश्री गुरव यांची नुकतीच निवड करण्यात आली. कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. जयश्री गुरव या बी.एसी., बी.एड. असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे अध्यापनाचे कार्य मोठे आहे.

जयश्री गुरव यांच्या निवडबद्दल आयोजित सत्कार समारंभास संस्थेचे अध्यक्ष डॉ.चिन्मय एरम, कोषाध्यक्ष प्रवीण पाठक, सचिव माधव माने, रश्मी एरम, लक्ष्मीनारायण सरलाया, अतुल शिंदे, संदीप पवार, गोरख करपे आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

जयश्री गुरव यांच्या अनुभवाचा डॉ.द.शि.एरम अपंग साहाय्य संस्थेच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या मूकबधिर विद्यालय, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, गुरूकुल माध्यमिक विद्यालय या तीन संस्थांना मोठा लाभ होईल आणि भविष्यकाळात या संस्था शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन अर्बन कुटुंबप्रमुख, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषराव जोशी यांनी केले. 

डॉ.द.शि.एरम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कै.शीलाताई एरम यांनी मूक बधिर विद्यालयाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून पुढील पिढीकडे या विद्यालयाची सूत्रे यानिमित्ताने सोपविली जात असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या विद्यालयाचे नाव देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी सत्काराप्रसंगी व्यक्त केला.