ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
गुडफ्रायडेला घरीच प्रार्थना-स्मरण करुन भगवान येशूंची शिकवण आचरणात आणा - -उपमुख्यमंत्रीअजित पवार
April 9, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

गुडफ्रायडेला घरीच प्रार्थना-स्मरण करुन भगवान येशूंची शिकवण आचरणात आणा - -उपमुख्यमंत्रीअजित पवार 

 मुंबई  : गुडफ्रायडेच्या निमित्ताने भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, त्याग, सेवाकार्याचं स्मरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं असून भगवान येशूंची मानवकल्याणाची शिकवण आचरणात आणावी. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन  गुडफ्रायडेला घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी, घरातचं रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे.

      गुडफ्रायडेच्या निमित्ताने भगवान येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचे स्मरण करण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार संदेशात म्हणतात की, मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान येशूंनी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं सदैव कल्याण करत राहतील. आज कोरोनामुळे मानवजात संकटात असताना भगवान येशूंचा विचार, सेवाकार्याचा संदेशच आपल्याला वाचवणार आहे. कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानं घरातंच थांबावे, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.