ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
खाजगी तीन व्यवसायिक गाळे सील सुमारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी
March 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

खाजगी तीन व्यवसायिक गाळे सील
सुमारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी

कराड - कराड नगरपालिकेच्या कर विभागाने खाजगी व्यावसायिक गाळेधारकांनी कर थकल्यामुळे तीन गाळे सील केले आहेत.तर चार जणांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. वारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी असल्यामुळे कर विभागाने सदरची कारवाई केली.

तहसील कचेरी परिसरातील दोन व पोपटभाई पेट्रोल पंप नजीकच्या एका गाळा सील करण्यात आला आहे. तर चार जणांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले आहे. कर विभागाने मंदीत व्यवसायिकांना थकित कर भरावा म्हणून सातत्याने नोटीस देऊनही खाजगी गाळेधारकांनी नगरपालिकेचा थकीत कर भरला नाही. यामुळे अखेर नगरपालिकेने व्यवसायिक गाळे सील करण्याचा निर्णय घेऊन आज कारवाई करण्यात आली.

कराडमधील व्यवसायिक गाळेधारकांनी व घर मालकांनी (मिळकतधारकांनी) नगरपालिकेचा थकित कर त्वरित भरावा, अन्यथा कर विभागाच्यावतीने कडक कारवाई करावी लागेल असा इशारा उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांनी दिला आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार कराड नगरपालिकेच्या कारवाईमध्ये उपमुख्याधिकारी विशाखा पवार, कर निरीक्षक उमेश महादर, लिपिक इखलास शेख, लिपिक सुरेश जाधव, राजेंद्र ढेरे, जितेंद्र मुळे, जयवंत यादव, सादिक मुल्ला, फिरोज मुजावर, अय्यज शेख, शिपाई कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली.