ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कोरोना बाधित 11 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह
April 9, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

कोरोना बाधित 11 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कराड : कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवातील 6 नागरिकांना तसेच श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 5 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या अनुमानितांचे  रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कोरोना बाधीताच्या निकट सहावातामध्ये 2 पुरुष व 4 महिला आहेत. तसेच श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 3 पुरुष व 2 महिला अशा या सर्व 11 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी दिला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली .