ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कराड येथे 2 रुग्णांची रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
April 19, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

कराड येथे 2 रुग्णांची रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

कराड : मागच्या महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय   तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापेमुळे   दाखल केले होते त्याचा आज अहवाल आला असून तो कोरोना बाधित निघाला आहे तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथे  30 वर्षीय पुरुष जो गेल्या महिन्यात पुण्यावरून आला होता, त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे भरती केले होते त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

रुग्णालयात दाखल असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.