ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कराडचा 35 वर्षीय तरुण कोरोना बाधितासह जिल्ह्यात 3 कोरोना बाधित; 18 रिपोर्ट निगेटिव्ह.....2 एप्रिल रोजी सायं. 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड19 ) आकडेवारी
April 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

कराडचा 35 वर्षीय तरुण कोरोना बाधितासह जिल्ह्यात 3 कोरोना बाधित; 18 रिपोर्ट निगेटिव्ह.....2 एप्रिल रोजी सायं. 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड19 ) आकडेवारी

कराड - काल 1 एप्रिल रोजी  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे  दाखल असणा-या 19 अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी  एक पुरु्ष रुग्णाचा (वय 35 वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील करुणा बागेत रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तसेच इतर १८ अनुमानित रुग्णांचे  अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील 2 संख्येवरून 3 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. विशेष म्हणजे कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या 19 अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालामधील 35 वर्ष पुरुष तरूणाचा कोरोना बाधित अहवाल आला आहे. 

दिनांक 2.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी

एकूण दाखल - 104
जिल्हा शासकीय रुग्णालय- 73
कृष्णा हॉस्पीटल, कराड- 30
खाजगी हॉस्पीटल- 1
कोरोना नमुने घेतलेले- 104
कोरोना बाधित अहवाल - 3
कोरोना अबाधित अहवाल - 97
अहवाल प्रलंबित - 4
डिस्चार्ज दिलेले- 97
सद्यस्थितीत दाखल- 7
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 1.4.2020)  -554
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 554
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 401
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती –153
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 50
यापैकी डिस्जार्ज केलेले- 15
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 1
अद्याप दाखल - 34