ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कमीत कमी लोकांनी एकत्र येऊन मशिदीमध्ये नमाज अदा करावी....कराडमधील सर्व मुस्लिम समाजाचा निर्णय
March 19, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

कमीत कमी लोकांनी एकत्र येऊन मशिदीमध्ये नमाज अदा करावी....कराडमधील सर्व मुस्लिम समाजाचा निर्णय

कराड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने एकत्र येऊन नमाज पडण्यापेक्षा नमाजासाठी नियोजन कमीत कमी जागेत करून नमाज पठण करावी असा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारी मुस्लिम समाज एकत्रित येऊन मशिदीमध्ये नमाजासाठी ज्यादा लोकांची गर्दी होत असते व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय पर्याय करू शकतो ? यावर कराड शहर मुस्लिम समाजाचे सर्व जिम्मेदार, शहरातील सर्व उलेमा कमेटी तबलिग जमआत जिम्मेदार, सुन्नी जमात यांचे संयुक्तीक बैठक होऊन त्यामध्ये शुक्रवारी होणाऱ्या नमाजीचे नियोजन कमीत कमी लोकांमध्ये मशीदीत नमाज आदा करण्याचे ठरले आहे.

जिल्हाधीकारी, जिल्हापोलिस प्रमुख, प्रांतसाहेब, तहसीलदार, यांचा आवाहनास प्रतिसाद देऊन कराड शहरामध्ये कोरोना व्हायरस थांबिवणेसाठी व समाजातील सदर रोगापासून वाचविणेसाठी शासनामार्फत राबिवल्या जाणाऱ्या विविध उपाय योजनांमध्ये एकत्रित गर्दीवरून प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी नमाजासाठी कमीत कमी लोकांनी एकत्र येऊन नमाज पठण करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. 

बाकीच्या लोकांनी घरीच नमाज अदा करावी व लहान मुले मशिदीत न-आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मदरसा व मक्तबला सुद्धा ३१ मार्च पर्यंत सुट्टी देण्याचे नियोजन केले आहे .सर्दी,पडसे,ताप, असणाऱ्यांनी व्यक्तींनी मशिदीत येणे टाळावे अशी सूचना देण्यात यावी. मशिदीजवळ सार्वजनिक
ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस यावर समाजातील सर्व शहरी नागरिक व प्रशासन एकत्र येऊन या रोगाचे उच्चाटन पूर्ण तालुक्यातून करूच परंतु शिरकाव सुद्धा होऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर कामी उपविभागीय अधिकारी दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सहकार्य करण्याची हमी दिली आहे. शहरातील जबाबदार मुस्लिम नागरिक व उलेमा कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यापुढे शासनाकडून जे निर्देश येतील त्याचे काटेकोरपने पालन करण्याचे मुस्लिम समाजाने मान्य केले.अशी सूचना सर्व तालुक्यातील मुस्लिम समाजाला देण्याचे नियोजन केले.