ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 12 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल 
April 24, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 12 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल 

कराड  : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच काल रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  2 व उपजिल्हा रुग्णालय,कराड येथे 10 असे एकूण 12 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.