ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले... यापैकी कराड तालुक्यातील 5 जण रुग्ण
April 28, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले... यापैकी कराड तालुक्यातील 5 जण रुग्ण

कराड - कराड येथे आज 5 कोरोना बाधित म्हूणन रिपोर्ट आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे. यापैकी कराड तालुक्यात 30 जण कोरोना बाधित रुग्ण आहेत.कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातारा जिल्ह्यात वाढत असताना सर्वाधिक रुग्ण हे कराड तालुक्यात आढळून येत आहेत. कराडच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

या रुग्णावर पुढील उपचार क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे करण्यात येणार आहे. आतापर्यंत 5 जणांना (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.