ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
अबुधाबी वरून आलेल्या एका संशयित रुग्णाला,शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल
March 16, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

अबुधाबी वरून आलेल्या एका संशयित रुग्णाला,शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल

सातारा -  सातारा जिल्ह्यात अबुधाबी येथून आलेल्या एका 30  वर्षीय तरुणाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे शासकीय  रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून या संशयित रुग्णाचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.