ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
अतिक्रमणे अजुनी काढावी लागतील...फोल्डेबल पायऱ्या कराव्यात... गटार स्वच्छतेसाठी जागा ठेवा - यशवंत डांगे
March 5, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

अतिक्रमणे अजुनी काढावी लागतील...फोल्डेबल पायऱ्या कराव्यात... गटार स्वच्छतेसाठी जागा ठेवा - यशवंत डांगे

कराड - कराड नगरपरिषदेचे हद्दीमधील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, कराड नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक सुरळीत होणेसाठी लोक हितास्तव गरजेचे असलेने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेवून सार्वजनिक रस्त्यावरील खोकी, टपऱ्या, हातगाडे, गटरवरील पायऱ्या, कट्टे, दुकानांचे प्रक्षेपण असलेले फलक काढणेत आलेले आहेत व अजूनही बरेच काढणेचे आहेत. असे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी प्रसिद्धीला पत्रकात म्हटले आहे.

यास्तव कराड नगरपरिषदेचे हद्दीमधील नागरीकांना, व्यापाऱ्यांना या अनुषंगाने आवाहन आले की, त्यांनी आपआपल्या दुकानासमोरील गटरवर पायऱ्यांचे पक्के बांधकाम मोठया लांबीमध्ये करू नये, गटर स्वच्छते करीता ठिकठिकाणी रिकाम्या जागा ठेवाव्यात, फोल्डेबल पायऱ्या कराव्यात तसेच दुकानांचे फलक रस्त्यावर प्रक्षेपण करू नये. ज्या व्यापाऱ्यांना त्यांचे खाजगी जागेत प्रक्षेपण करून बोर्ड/फलक लावणेचे आहेत त्यासाठी नगरपरिषदेकडून नाहरकत दाखला घेणे सोईचे होईल. याबाबत पुढील कटू प्रसंग टाळून नगरपरिषदेला सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे. तसेच याबाबत धोरण निश्चीतीसाठी नागरीकांच्या काही सकारात्मक सुचना असतील तर त्यांनी कराव्यात, त्याचे स्वागत करू असेही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.