ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
"सह्याद्री"साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध .......सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांचा विश्वास
January 28, 2020 • GORAKH TAWARE

"सह्याद्री"साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध .......सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांचा विश्वास 

कराड (गोरख तावरे) - "सह्याद्री" सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवून सभासदांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली होती. "सह्याद्री" कार्यक्षेत्रातील १६७ उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. दरम्यान बहुतांश सभासद उमेदवार हे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणारे समर्थकांचे अर्ज होते.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत २१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आणि बाकीच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे.आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी "सह्याद्री" साखर कारखान्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विकासात्मक पायवाटेने कार्य करीत असल्यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी पुन्हा एकदा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला आहे.