ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
"अशोकराज" स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त महिला पालकांचा मेळावा
March 8, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

"अशोकराज" स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त महिला पालकांचा मेळावा

कराड - अशोकराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.शोभा देसाई ( कराड) उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अंबपकर यांनी केले.दीव्या पाटील,चैतन्या देसाई व वैष्णवी शिंगण या मुलींनी आपली मनोगत व्यक्त केले.शाळेच्या उपशिक्षिका कोमल गरुड यांनी "महिलांना आजही समाजात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे "हे स्पष्ट केले.डॉ.देसाई यांनी "महिलांनी स्वत:सक्षम झालं पाहिजे "असे मत व्यक्त केले. 

या महिला मेळाव्यासाठी कोळे गावातील महिला प्रतिनिधी म्हणून अरुणा देसाई उपस्थित होत्या. महिला पालकांचा सहभाग होता. शाळेचे प्रशासक श्री सुनील मोरे उपस्थित होते.सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या उपशिक्षिका परवीन शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पूनम मोहिते यांनी आभार मानले.