संवेदनशील मनाचे डॉक्टर डॉ. दिलीप सोलंकी
"रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" या धोरणानुसार काम करणारे समाजात हाताच्या बोटावर मोजणारे डॉक्टर आहेत. सर्व सेवांमध्ये रुग्णसेवा ही अत्यंत महत्त्वाची व गरजेची आहे. कराड येथील डॉ. दिलीप सोलंकी यांना समाजभान असल्याने आत्तापर्यंत त्यांनी कराडमधील अनेक रुग्णांची मोफत सेवा करीत असतात. त्याचबरोबर कराडमधील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजाप्रती संवेदना असणारे डॉ. दिलीप सोळंकी यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
कराड येथे प्राथमिक शिक्षण होली फॅमिली येथे झाले असून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण पुणे येथे झाले आहे. डॉक्टर दिलीप सोळंकी यांचा शैक्षणिक प्रवास कराड - पुणे - कराड असा झाला आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय सेवेचा शुभारंभ कराड येथेच केला. लोकांचा व रुग्णांना असणाऱ्या त्रासाबाबत अचूक निदान करणे. योग्य मार्गदर्शन करणे. समाजातील गरीब - गरजू लोकांना सर्वतोपरी मदत सहकार्य करणे. वैद्यकीय सेवेचा अधिकाधिक लोकांना अल्प खर्चामध्ये औषधोपचार करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सातत्याने आजही डॉक्टर दिलीप सोळंके करीत आहेत.गेले पंचवीस वर्षे डॉक्टर दिलीप सोळुंकी हे कराडकरांची वैद्यकीय सेवा करीत आहेत. वैद्यकीय सेवा करीत असताना केवळ पैसे मिळवणे हा हेतू न ठेवता. आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा अधिकाधिक लाभ, फायदा समाजातील विविध घटकांना मिळाला पाहिजे, यासाठी दिलीप सोळंकी नेहमी आग्रही असतात.
डॉक्टर दिलीप सोलंकी यांचा लोकसंपर्क चांगला असल्याने मलकापूरसह कराडमध्ये शनिवार पेठेत दवाखाना सुरू करून ते रुग्णसेवा करीत आहेत. वैद्यकीय सेवा करीत असताना आपले कर्तव्य म्हणून कराडमधील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये डॉक्टर दिलीप सोळंकी सहभागी होत असतात.मितभाषी, संयमी व मदतीसाठी पुढे येण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे महसूल, पोलीस, पत्रकार आदी सर्वच घटकातील वरिष्ठापासून कर्मचाऱ्याच्या विश्वासाचे डॉक्टर म्हणून ही ते परिचित आहेत. डॉक्टर दिलीप सोळंकी यांचे व्यक्तिमत्व हे दिलखुलास, स्पष्ट बोलणे असे आहे. समाजाप्रती आस्ता, प्रेम, जिव्हाळा आणि सहकार्याची भावना मनी सदैव जागृत असल्याने कराडच्या विविध उपक्रमांमध्ये डॉक्टर दिलीप सोळंकी हे व्यक्तिमत्व सदासर्वदा सर्व ठिकाणी दिसून येतात. गणेश उत्सवामध्ये सर्व ठिकाणी दिलीप सोळंकी कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसून येतात. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना काळात बंदोबस्ताचा ताण असतो. या मानसिक ताणातून मुक्त करण्यासाठी व ताण विरहित काम करण्यासाठी ताजेतवाने मन ठेवून आरोग्यमय काम कसे करावे यासाठी डॉक्टर दिलीप सोळंकी सातत्याने प्रयत्न व काम करीत असतात.सार्वजनिक गणेश मंडळांना प्रशासनातर्फे देण्यात येणार्या पुरस्कारासाठी असणाऱ्या अवॉर्ड कमिटीमध्ये डॉक्टर दिलीप सोळंकी काम करतात.
सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी असतानाच धार्मिक कार्यांची ही गोडी डॉक्टर दिलीप सोलंकी यांना असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रम विधिवत व नियोजनबद्ध झाले पाहिजेत. यासाठी डॉक्टर दिलीप सोळंकी आग्रही असतात. प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा परंपरेनुसार साजरे झाले पाहिजेत. त्याला आधुनिकतेचा बाज न येता. ज्या परंपरा आहेत. चालीरीती आहेत. त्यानुसार धार्मिक उत्सव साजरे व्हावेत. असा आग्रह डॉक्टर दिलीप सोलंकी धरतात. मात्र यामधून अंधश्रद्धा वाढणार नाही. असाही त्यांचा प्रयत्न असतो.
सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्लिनिक या ठिकाणी डॉक्टर दिलीप सोलंकी यांनी आपली सेवा बजावलेली आहे. ही सेवा बजावताना याठिकाणीही लोकांना आरोग्याची चांगली सुविधा देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये समाजातील विविध घटकांना मदत व्हावी. यासाठी डॉक्टर दिलीप सोलंकी पुढाकार घेत असतात. पूरपरिस्थितीच्या काळामध्ये डॉक्टर दिलीप सोलंकी यांनी काम केले आहे. तर कराड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, सर्वरोग निदान शिबिर असे आयोजन करून समाजातील विविध घटकांना अल्प खर्चात, मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सध्या "कोरोना" सारखे महाभयंकर महामारीचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. कराड शहर व तालुका याला अपवाद नाही. या काळामध्ये "करायची माणुसकी" नामक कराडमधील स्वयंसेवकांनी एकत्र येऊन गरीब, गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप केले आहे. औषधांचे वाटपही केले आहे. यामध्ये विशेषता मास्क, सॅनीटायझर यांचा समावेश होता. डॉक्टर दिलीप सोळंकी हे कराड व परिसरातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतात. समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सामाजिक क्षेत्रात वावरत असतानाही डॉक्टर दिलीप सोळंकी हे प्रसिद्धीपासून दूर असतात. आज डॉक्टर दिलीप सोळंकी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्याचा ओझरता घेतलेला आढावा. यापेक्षाही अधिकचे काम डॉक्टर दिलीप सोळंके यांनी केले आहे. समाजाभिमुख दृष्टी असणारे, समाजाप्रती प्रेम असणारे, समाजातील गोरगरीब, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मनोभावे विचार बाळगून वैद्यकीय सेवा करणारे, आमचे मित्र डॉक्टर दिलीप सोळुंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
गोरख तावरे,कराड
9326711721