कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील सरसावले गरजूंना मदतीसाठी...अन्नधान्याचे दोन हजार किटचे वाटप
कराड : कोरोना व्हायरसच्या महामारीच्या संकट काळामध्ये कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील अनेकांच्या मदतीला धावून आले. दरम्यान उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये. या भावनेने केलेली मदतीचा कोणताही गाजावाजा अथवा प्रसिद्धी केली नाही. इतकेच काय तर अन्नधान्याच्या दिलेल्या वस्तूचे फोटोही काढले नाहीत.
लॉकडाऊन काळामध्ये अनेक कराडकारांची गैरसोय झाली. अनेकांच्या घरातील अन्नधान्य संपले. कराडमध्ये अनेक गोरगरिब आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनीही गरजूंना मदतीचा हात दिला आहे. कराड शहरातील सुमारे दोन हजार कुटुंबांना उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील त्यांनी अन्नधान्याचे मोफत वाटप केले आहे.
उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी गोरगरीब व गरजू लोकांसाठी तांदूळ, गहू, साखर, डाळ, मीठ, तेल असे अन्नधान्याची कीटचे कराडमध्ये वाटप करण्यात आले आहे. कराड मधील कुटुंबांना उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचे दायित्व असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. संकटकाळात मदतीसाठी धावून येणाऱ्या आणि सामाजिक परिस्थितीची जाण असणारे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी 2000 अन्नधान्याचे किट वाटप केले आहे.