पाटण : 5 ग्रामपंचायतींसह नगरपंचायत क्षेत्रातील किराणा व औषधांची दुकाने 9 ते 2 पर्यंत उघडण्यास सुट
कराड - सातारा या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पाटण तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील ओदश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणा मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, तळमावले, मल्हार पेठ, नाडे (नवा रस्ता), तारळे इत्यादी ग्रामपंचायतींना व नगर पंचायत पाटण या परिसराच्या नजीक असलेल्या कराड परिसरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्यासाठी सुट देण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रांमध्ये भाजीपाला घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, पाटण ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्याप्रमाणे भाजीपाला घरपोच पुरविण्यात येईल.