*सह्याद्री हॉस्पिटल मधून आज तिघे कोरोनामुक्त,36 नागरिक विलगीकरण कक्षात*


*सह्याद्री हॉस्पिटल मधून आज तिघे कोरोनामुक्त,36 नागरिक विलगीकरण कक्षात*


कराड : सह्याद्री हॉस्पिटल कराड येथील 3 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


      सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 25, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 27 असे एकूण 62  कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 61 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित एका रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.


36 नागरिक विलगीकरण कक्षात


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 12 (प्रवास करुन आलेले 5, कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित 6, श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गाचे 1), कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 13 (कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित 8, गरोदर माता 1, आरोग्य कर्मचारी 1, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गाचे 3), उप जिल्हा रुग्णालय फलटण येथे  8 (कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित 1, आरोग्य कर्मचारी 1)  व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित 3 अशा एकूण 36 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.


या 36 नागरिकांचे व कोरोनाबाधित 8 रुग्णांच्या  14 दिवसानंतरचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 129 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 63 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 64 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.