लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
पुणे : लायन्सक्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, लायन्स क्लब सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता,लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फत्तेचंद रांका,खजिनदार योगेश शहा,संतोष पटवा,पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया उपस्थित होते.
पुणे व्यापारी महासंघ, पुणे सराफ असोसिएशन आणि गोडवाड जैन संघ यांच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर्स,पोलीस,सफाई कर्मचारी आणि बेघर नागरिकांसाठी करण्यात येत असलेल्या मदातकार्याची माहिती फतेचंद रांका यांनी यावेळी डॉ. म्हैसेकर यांना देऊन पुणे व्यापारी महासंघ आणि पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने अधिकाधिक व्यापारी वर्ग मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव मदत करतील, असे सांगितले.