सात जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह .नऊ...अनुमानित रुग्णांचा अहवाल प्रलंबित
कराड -क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 2, उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 2, ग्रामीण रुग्णालय, कोरेगांव येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 1 अशा एकूण 7 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
काल दि. 15 एप्रिल रोजी रात्री उशीरा मुंबई व इतर ठिकाणाहून प्रवास करुन आलेल्या 5 नागरिकांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात तर ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 6 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे असे एकूण 11 जणांना अनुमानितांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी कोरेगांव येथील 2 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. उर्वरित 9 या जणांचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
तसेच कृष्णा हॉस्पिटल कराड येथे विलगिकरण कक्षात दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाच्या घशातील स्त्रावांचा नमुना 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणी करीता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यातआला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.