कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्ग आजारामुळे सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्ग आजारामुळे सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


 सातारा  : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा यांनी  सातारा शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढील प्रमाणे बदल केले आहेत.


 सातारा शहरामध्ये येणारे सर्व मुख्य व इतर रस्त्यांमध्ये बदल करण्यात येत असून, त्यामध्ये  सातारा शहरामध्ये कोरेगाव सातारा या रोडवरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक व मेढारोड वरील मोळाचा ओढा येथून फक्त वाहने शहरात येणास व बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्याव्यतीरिक्त  सातारा शहरामध्ये येणारे इतर सर्व मुख्य रस्ते व इतर आत येणारे छाटे-छोटे रस्ते पुढील आदेशापर्यंत सातारा शहरात प्रवेश करण्यास व शहरातून बाहेर पडण्यास बंद करण्यात येत आहे.


 तसेच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून विनाकारण फिरत असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर तसेच विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर नियमाप्रमाणे योग्य ती कडक कारवाई करण्याचेही  उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा यांनी सांगितले आहे.