५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका. 


५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका. 


मुंबई - येत्या पाच तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी लाईट घालवा आणि दिवे लावा असं आवाहन पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं जरा वेगळं आहे. 


लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा. 


आणि जे आपल्या राज्यातील लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या. फक्त १०१ रुपये. (अन त्याचा स्टेट्स आपल्या व्हाॅट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा)


लक्षात ठेवा मित्रांनो, अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. 
उजेडात होते ते पुण्य, अन अंधारात होत ते पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची कोणास संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा! अन ते पुण्याच काम करायच आहे आपल्या राज्यातील आपल्यासाठी आहोरात्र झटणा-या व्यक्तींसाठी...! सो लक्षात ठेवा १०१ रुपयांच आपल मुख्यमंत्री साहाय्यता कक्षात दान देऊन या सर्व लोकांच्या मागे खंबीरपणे उभे राहुयात!!!


सोबत- मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे बॅंक डिटेल्स


Chief Minister's Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720


State Bank of India, Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300


Google pay मध्ये maharashtra government म्हणून एक ऑप्शन आहे तिथूनही करू शकता !