व्यापारी, उद्योजक यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे....छावा क्रांतीवीर सेना कराड तालुका अध्यक्ष सागर साळुंखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


व्यापारी, उद्योजक यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे....छावा क्रांतीवीर सेना कराड तालुका अध्यक्ष सागर साळुंखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


कराड - सरकारने जशी शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली आहे. त्याच प्रकारे सरकारने लॉक डाऊन काळातील व्यापारी, उद्योजक व इतर नागरिकांचे विविध कर्जांवरील व्याज माफ करावे. नुसते 3 महिने व्याज भरू नका म्हटले तरी नंतर तर ते द्यावे लागणारच आहेत. तेव्हा सरकारने व्यापारी, उद्योजक यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छावा क्रांतीवीर सेना कराड तालुका अध्यक्ष सागर भारत साळुंखे यांनी दिले आहे.


व्यापारी व उद्योगपतींना सरकार सांगते आहे की, कामगारांना पगार द्या, त्यांचे घर कसे चालणार ? पण व्यावसायिकांना उत्पनच नसेल आणि विकलेल्या मालाची उधारीच येत नसेल तर व्यावसायिक  पैसे कोठून आणणार यांचा आता सरकारने विचार करावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रामध्ये केंद्र व राज्य सरकारला उपाय सुचवण्यात आला आहे तो असा की, सरकारने जर व्यावसायिकांचे लॉकडाऊन काळातील व्याज माफ केले तर त्यांना कमीतकमी कामगारांचे पगार देता येतील व  स्वतःचे घर देखील चालवता येईल. अगदीच सरकारची व्यावसायिकांकडून करोना बधितांसाठी  मदतीची मागणी असेल तर माफ केलेल्या व्याजातील 10%  रक्कम करोना बाधित रुग्णानसाठी द्यावेत आणि ते थेट बँकेतूनच घेऊन तसे व्यावसायिकांना सर्टिफिकेट द्यावे. आणि तेवढी रक्कम 80 G खाली घ्यावी. यामुळे व्यावसायिकांना देखील  करोना रुग्णांना मदत केल्याचे समाधान मिळेल.


याचबरोबर  सरकारने  हेही लक्षात घेतले पाहिजे की, कर गोळा करून सरकारी नियमांप्रमाणे भरण्याचे महत्वाचे कामही व्यवसाईकच करतात. व्यावसायिक म्हणजे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रथाची मजबूत चाके असतात. आणि सरकारने त्यांना बळ देणे आवश्यक आहे. असे पत्रात नमूद केले असून केंद्र व राज्य सरकारने व्यापारी उद्योजकांचे व्याज माफ करावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.