आरोग्य सेवा, स्वच्छता कर्मचारी, पोलिसांना शाबासकी

 


आरोग्य सेवा, स्वच्छता कर्मचारी, पोलिसांना शाबासकी


मुंबई - कोरोनाविरुद्ध लढ्यात आघाडीवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच जीवनावश्यक सुविधा पुरविणारे लोक अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तपस्व्याप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.   


मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार, अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह व नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने तसेच मुंबईशहर, उपनगर, रायगड, ठाणे, पुणे, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या अखत्यारीतील कोरोना व स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थेची माहिती दिली.