सातारा जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह
सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
*दिनांक 15.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*
1. | क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा | 264 |
2. | कृष्णा हॉस्पीटल, कराड- | 186 |
3. | खाजगी हॉस्पीटल- | 4 |
4. | एकूण दाखल - | 454 |
*प्रवासी-116, निकट सहवासीत-232, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-106 = एकूण 454* | ||
5. | 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- | 5 |
6 | कोरोना नमुने घेतलेले एकूण- | 459 |
7. | कोरोना बाधित अहवाल - | 11 |
8. | कोरोना अबाधित अहवाल - | 429 |
9. | अहवाल प्रलंबित - | 14 |
10. | डिस्चार्ज दिलेले- | 430 |
11. | मृत्यू | 2 |
12. | सद्यस्थितीत दाखल- | 22 |
13. | आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 14.4.2020) - | 890 |
14. | होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - | 890 |
15. | होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - | 583 |
16. | होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – | 307 |
17. | संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- | 153 |
18. | आज दाखल | 4 |
19 | यापैकी डिस्जार्ज केलेले- | 74 |
20. | यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- | 0 |
21. | अद्याप दाखल - | 79 |