8 निगेटिव्ह रिपोर्ट.... कराडमध्ये 55, सातारा 8 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल


8 निगेटिव्ह रिपोर्ट.... कराडमध्ये 55, सातारा 8 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल


कराड :  जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 6, कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे 1 व खासगी हॉस्पिप्टमधील दाखल असलेल्या 1 असे एकणू 8 जाणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.


  जर्मन ते मस्कत ते दिल्ली असा प्रवास करुन आलेल्या 31 वर्षीय पुरुष तसेच दिल्ली येथून प्रवास करुन आलेल्या 18 वर्षीय युवकाला  व 45 वर्षीय पुरुषाला असे एकूण 3 जणांना जिल्हा रुग्णालयातील विलीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  तसेच कोविड-19 बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 40 पुरुष व 15 महिलांना कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे   पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.