63 वर्षीय पुरुषाचा मृत्यु ह्दय विकाराने ...8 रिपोर्ट निगेटिव्ह तर 9 अनुमानित म्हणून दाखल



63 वर्षीय पुरुषाचा मृत्यु ह्दय विकाराने ...8 रिपोर्ट निगेटिव्ह तर 9 अनुमानित म्हणून दाखल


कराड : सातारा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 2 कोविड-19 बाधित रुग्णांचे नमुने एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडे  पाठविण्यात आले होते. या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविण्यात आले होते. यापैकी 63 वर्षे पुरुष रुग्ण सकाळी बाथरुमला जाताना खाली कोसळून त्याच्या तब्येतीमध्ये अचाकन बिघाड झाला. ड्युटीवर असणाऱ्या फिजीशियन यांनी सर्वोतोपरी उपचार केले परंतु या 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  या पुरुषाचा मृत्यु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा, असा उपचार करणाऱ्या फिजीशियन यांचा प्राथमिक अंदाज आहे. या 63 वर्षीय पुरुषाच्या घशातील स्त्रावाचा नमुना  आज एन. आय. व्ही. पुणे  येथे  आज पाठविण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.   


        5 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या एक 37 वर्षीय पुरुषाला व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या 7 अनुमानित रुग्णांचे असे एकूण 8 जणांचे घशातील स्त्रावाचा नमुना  आज एन. आय. व्ही. पुणे  येथे आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तसेच कोवडि-19 बाधित रुग्णाच्या सहवासीत असणाऱ्या 17 ते 54 वर्ष वयोगटातील 9 नागरिकांना (पुरुष-4 व महिला 5) यांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना  आज एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.